संतांच्या रौप्यमुद्रिकांचे
प्रकाशन
पुणे: श्री समर्थ रामदास जन्मोत्सव
चतु:शताब्दी सोहळा समितीतर्फे संत
तुकाराममहाराज व समर्थ रामदासस्वामी
यांच्या रौप्यमुद्रिका तयार करण्यात
आल्या आहेत. त्याचे प्रकाशन पंचखंड
पीठाचे आचार्य धर्मेंद्रमहाराज
यांच्या हस्ते झाले आहे.
शनिवारवाड्यावर झालेल्या या
कार्यक्रमाला देहूचे मोरेमहाराज आणि
चिंचवडच्या मंगला कांबळे उपस्थित
होत्या. या रौप्यमुद्रिकांच्या एका
बाजूस त्यांचे जन्मस्थळ मुद्रित आहे.
देवपूजेतील टांकाप्रमाणे या
मुद्रिकांची रचना आहे. या मुद्रा पी.
एन. गाडगीळ यांच्याकडे विक्रीसाठी
उपलब्ध असल्याची माहिती समितीने
कळविली आहे.
Best viewed in Internet Explorer and Firefox with resolution 1024 X 768