Slide Background
श्री समर्थ रामदास
बलशाली आणि चारित्र्यसम्पन्न मानवधर्म हे ज्यांचे उद्दिष्ट असे सार्वकालिक संत! त्यांच्या वाणीने सुमारे चारशे वर्षांपूर्वी मरगळलेल्या महाराष्ट्राला संजीवनी दिली होती.

आजचा भारत गरीबी, भ्रष्ट्राचार दुबळेपणा स्वैराचार, उपभोगवाद, यांच्या जाळ्यात सापडला आहे. विवेक आणि योग्य आचारधर्माची शिकवण देणारे समर्थान्चे विचारच दिशाहीन भरकटणार्‍या आजच्या तरुणाईला योग्य मार्गावर आणू शकतात. आत्मसन्मान, आत्मसंयम, आरोग्य आणि समय व्यवस्थापनाचे भान आणून देणारी श्री रामदासांची शिकवण ही आपली जणू वडिलार्जित संपत्ति ! तिचे आपण संपादन करु या. परमार्थाची कास न सोडता निर्मिलेली खरी व्यवहारवादी आणि त्याच वेळी कर्मयोगी आणि चारित्र्यवान जीवनाची मंत्राक्षरी म्हणजे समर्थवचन!
Slide Background
Slide Background

Subject

Language

Authors

Mobile Ringtones

Translate »